indian currency

आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये घरातून किंवा कार्यालयातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व मौल्यवान वस्तू जप्त झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येतात. त्यामुळे अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो – घरात रोख ठेवणे बेकायदेशीर आहे का? किती रक्कम ठेवता येते?

प्रत्यक्षात, भारतात घरात ठेवता येणाऱ्या रोख रकमेसाठी कोणतेही कायदेशीर मर्यादित बंधन नाही. आयकर विभागाने यावर कोणतीही निश्चित मर्यादा घातलेली नाही. मात्र, महत्त्वाची अट म्हणजे पारदर्शकता. घरात ठेवलेली रक्कम ही वैध उत्पन्नातून आलेली असावी आणि तिचा स्रोत स्पष्टपणे दाखवता यायला हवा.

आयकर कायद्याच्या कलम 68 ते 69B मध्ये अस्पष्ट उत्पन्न व गुंतवणुकीबाबत तरतुदी आहेत. जर रोख रक्कमेचा स्रोत दाखवता आला नाही, तर ती अघोषित उत्पन्न मानली जाऊन कर व दंड आकारला जाऊ शकतो. काही प्रकरणांत ही जबाबदारी 78% पर्यंत पोहोचू शकते.

म्हणूनच मोठ्या प्रमाणात रोख ठेवताना योग्य नोंदी ठेवणे आवश्यक आहे.

  • व्यवसायिकांनी कॅशबुक किंवा खातेपुस्तक ठेवावे.
  • बँक स्टेटमेंट्स, पावत्या व आयटीआर दाखले जतन करावेत.
  • भेटवस्तू किंवा कर्ज रोख स्वरूपात मिळाल्यास त्याची नोंद ठेवावी.

व्यवसायिक व मोठ्या व्यवहार करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. मालमत्ता व्यवहार किंवा गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात अस्पष्ट रोख व्यवहार टाळावेत.

By Business Varta

बिझनेस वार्ता हे ई-मॅगझीन स्वयंसिद्धा फाउंडेशन, मुंबई यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेले एक माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्यासपीठ आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणारे होतकरू उद्योजक तसेच आधीपासून व्यवसाय करत असलेले उद्योजक यांना मार्गदर्शन, माहिती आणि प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आपले विचार शेअर करा, कॉमेंट करा

error: Content is protected !!