आजच्या काळात पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लहान वयापासूनच आर्थिक नियोजन करतात. अशा वेळी मायनर पॅन कार्ड महत्त्वाचे ठरते. गुंतवणूक, बँक खाते उघडणे किंवा विमा योजनांमध्ये मुलाला नामनिर्देशित करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.
लहान मुलांच्या नावाने म्युच्युअल फंड, फिक्स्ड डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असल्यास पॅन कार्डशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नाही. तसेच, मुलाच्या नावाने बँक खाते उघडताना किंवा विमा/गुंतवणुकीत नामनिर्देशित करताना पॅन कार्ड आवश्यक असते.
जर मुलाला स्वतःचे उत्पन्न असेल (उदा. बालकलाकार, यूट्यूबर किंवा इतर माध्यमातून), तर त्यासाठी पॅन कार्ड हा अनिवार्य दस्तऐवज ठरतो. मात्र, अल्पवयीन मुलगा/मुलगी स्वतः अर्ज करू शकत नाही. ही जबाबदारी पालक किंवा कायदेशीर संरक्षकांवर असते.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्गांनी मायनर पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो. अर्ज करताना मुलाचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात.