businessvarta

महिला बचत गटांसाठी एक दिलासादायक बातमी! महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात (पोक्रा फेज २) महिला बचत गटांना शेती यंत्रसामग्री बँक स्थापनेसाठी २४ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. ही योजना वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने राबवली जात असून, ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

UMED किंवा MAVIM अंतर्गत नोंदणीकृत आणि किमान १० सदस्य असलेले बचत गट या योजनेसाठी पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून, DBT पोर्टल किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज करता येईल. एका गावातून एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड केली जाईल.

योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या ६०% अनुदान दिले जाईल, ज्याची कमाल मर्यादा ₹२४ लाख आहे. ₹२० लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांसाठी बँक कर्ज घेणे आवश्यक आहे. ट्रॅक्टर, बीबीएफ मशीन, बेड मेकर, सिडर, थ्रेशर यांसारखी हवामान अनुकूल यंत्रसामग्री या योजनेत समाविष्ट आहे.

प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांनी महिला गटांना आवाहन केले आहे की, त्यांनी ही संधी वापरून स्थानिक शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात सेवा पुरवाव्यात आणि शेती क्षेत्रात योगदान द्यावे.

अधिक माहितीसाठी अधिकृत पोक्रा संकेतस्थळ ndksp.mahapocra.gov.in ला भेट द्यावी.

आपले विचार शेअर करा, कॉमेंट करा

error: Content is protected !!

Discover more from बिझनेस वार्ता

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading